Pandharpur vitthal rakhumai wari

Home  ›  Pandurang Vitthal  ›  Ashadhi Ekadashi Wari (आषाढी एकादशी वारी)

Introduction


|| Jay Hari Vitthal ||
|| Shri Hari Vitthal ||

Pandharpur Wari is an annual pilgrimage to Pandharpur, Maharashtra, India.
Pandharpur is the seat of Hindu god Vithoba also known as Vitthal, Pandurang, Hari.
This pilgrimage to pandharpur is carried our thrice a year namely, Ashadhi Wari, kartiki wari and Maghee wari.
Ashadhi wari starts in hindu calendar month named Jyeshtha and after 21 days pilgrimage reaches Pandharpur on 10th day of lunar calendar month Ashadh.
on 11th day of lunar calendar Ashadhi Ekadashi is getting celebrated by few thousands people who walks with many Dindis in Wari.
In hindu month of Kartik and Magh also similar kind of event if been celebrated.

Out of these many dindi or palakhi in Wari, Sant Dnyaneshwar dindi and Sant Tukaram dindi is considered as two main and big dindis.
Sant Dnyaneshwar dindi starts from Alandi (Pune district in Maharashtra) and walks through Pune - Sasvad - Jejuri - Lonand - Taradgaon - Phaltan - Natepute - Malshiras - Velapur - Shegaon -Vakhari and finally reach at Pandharpur to conclude the Wari.
Sant Tukaram Dindi starts from Dehu (Pune District in Maharashtra) and walks through Akurdi - Lonikalbhor - Yavat - Varvand - Baramati - Indapur - Akaluj - Vakhari and finally reaches to Pandharpur to conclude the Wari.
Few thousands of people walk through these Wari and after 21 days of walk finally reaches to pandharpur to celebrate Ashadhi Ekadashi.

Nowadsys few thousands people walk through sant Dnyaneshwar and sant Tukaram palakhi but this pilgrimage was there even before the birth of Sant Dnyaneshwar and Sant Tukaram.
Sant Dnyaneshwar's father, Vitthalpant used to bring his children to Pandharpur with wari.

The whole is divided into a sub groups called as Dindi. There are more than 200 Dindi on each route.
Each dindi has between 100 and 500 members. The palkhi is at the centre of the Wari procession and around half the number of Dindi are ahead of the palkhi and the other half are behind.
All Dindis are assigned their number and position in the procession and the sequence is strictly followed. The timetable of Wari route is published well in advance and is strictly followed.
It is well defined and minute details are made available including starting location, the location of breaks including lunch, rest, night stay location.
Every morning, early dawn, after worshiping the Sanits footwear, the palkhi sets out at 6am. A Tutari (wind instrument) is blown thrice to alert all Warkaris. At the first signal, all Warkaris get ready to leave. At the second signal, the dindis stand in the queue as per designated sequence and at the third signal, they starts walking.
After 4 to 5 km, they take a quick break for breakfast. They break for lunch as per the given schedule.

The person who walks through Pandharichi Wari is called as Varkari and all these Varkaris together form popular varkari cult in Maharashtra.

pandharpur Sant Namdev praises Pandhari (Pandharpur) by saying,
आधी रचली पंढरी । मग वैकुंठ नगरी ।।
जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ।।


Meaning : Pandhari was there even before Vaikunth.

To describe river passes through pandharpur named Chandrabhaga, he mentions,
जेव्हा नव्हती गोदा गंगा । तेव्हा होती चंद्रभागा ।।

Sant Dnyaneshwar mentioned about Wari in one of his abhang as,
साधु संत मायबाप तिही केले कृपादान ।
पंढरीचे यात्रे नेले घडले चंद्रभागा स्नान॥


Further Sant Namdev mentioned about Ashadhi Wari and Kartik Wari in prayer of pandharpur vitthal as,
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती।।
दर्शन हे कामाचे तया होय मुक्ती।
केशवासी नामदेव भावे ओवाळती।।


Many thousands people participates in this auspecious event of pilgrimage.
पंढरीचा वारकरी | वारी चुको न दे हरी ||
Also they pray to pandharpur vitthal not to let people miss this pilgrimage (wari) due to any reason.

Sant Tukaram doesn't ask for anything else but he begs to vitthal for not having any moment in his life when he may forget his favorite pandharpur vitthal,
हेची दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।।
गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ।।
न लगे मुक्ती धन संपदा । संत संग देई सदा ।।
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावी आम्हांसी ।।


During this pilgrimage Wari event, people considers each other as some kind of saint or pandharpur and they treat each other likewise.
Hence this wari is on eof the best event to re-establish and flourish humanity among people of varkari sampraday.
Pandharpur Wari plays great role to bind people with each other during this auspecious event.

|| Jay Hari Vitthal ||
|| Shri Hari Vitthal ||


|| Vitthal || Vitthal || Vitthal ||



।। जय हरी विठ्ठल ।।
।। विठ्ठल ।। विठ्ठल ।। विठ्ठल ।।


पांडुरंगाची वारी (विठ्ठलाची वारी) ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. ही पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा एक भक्कम असा आधार आहे.
आज लाखो लोक शेकडो दिंड्यांतून चालत पंढरीच्या आषाढी यात्रेला येतात. ही पायी वारीची परंपरा हजारो वर्षांपेक्षा जुनी आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांची पालखी पुण्याहून पंढरपूर कडे रवाना होते, पण वारीची ही परंपरा ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीपासूनही चालू होती. त्यांचे वडील विठ्ठलपंत पंढरीचे वारकरी होते. ते ज्ञानदेवांना व इतर मुलांना पंढरीच्या वारीला घेवून गेले.

आधी रचली पंढरी । मग वैकुंठ नगरी ।।
जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ।।


असे पंढरीचे समृद्ध असे वर्णन संत नामदेवांनी करून ठेवले आहे. असे हे पंढरपूर हजारो वर्षांपासून आहे आणि त्या पंढरीची वारी ही नित्य नियमाने केली जाते.
पंढरपूरमधून वाहणाऱ्या अर्ध चंद्रकृती चंद्रभागेचे वर्णन करताना संत नामदेव म्हणतात,
जेव्हा नव्हती गोदा गंगा । तेव्हा होती चंद्रभागा ।।

तसेच संत ज्ञानेश्वरांनी आपल्या एका अभंगात म्हटले आहे कि,
साधु संत मायबाप तिही केले कृपादान ।
पंढरीचे यात्रे नेले घडले चंद्रभागा स्नान॥


नामदेवांनी विठ्ठलाच्या आरतीत आषाढी व कार्तिकी यात्रेचा उल्लेख केला आहे.
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती।।
दर्शन हे कामाचे तया होय मुक्ती।
केशवासी नामदेव भावे ओवाळती।।


आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस ही यात्रा भरते. या एकादशीस देवशयनी एकादशी असेही म्हणतात.
संत ज्ञानेश्वरांची पालखी ही आळंदीहून निघते आणि पुणे - सासवड - जेजुरी - लोणंद - तरडगांव - फलटण - नातेपुते - माळशिरस - वेळापूर - शेगांव - वाखरी असा प्रवास करत पंढरपूर ला पोहोचते.
संत तुकारामांची पालखी देहूहून निघते आणि पुढे आकुर्डी - लोणीकाळभोर - यावत - वरवंड - बारामती - इंदापुर - अकलूज - वाखरी असा प्रवास करत पंढरपूर ला पोहोचते.
लाखोंच्या संख्येने भक्तगण या पायी वारीमध्ये सहभागी होतात आणि चालत २१ दिवसांचा प्रवास करत पंढरपूर च्या विठ्ठलाला येऊन भेटतात.

पंढरीचा वारकरी | वारी चुको न दे हरी ||

पंढरपूरच्या विठ्ठलाकडे संत तुकाराम एकच आळवणी करतात,
हेची दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।।
गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ।।
न लगे मुक्ती धन संपदा । संत संग देई सदा ।।
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावी आम्हांसी ।।


या पंढरपूरच्या वारीमध्ये प्रत्येक जण हा संतांप्रमाणे समजून, प्रत्येकाला विठ्ठलाचे रूप समजून सर्व वारकरी मोठ्या भक्तिभावाने हा प्रवास "ग्यानबा तुकाराम" च्या जयघोषात पूर्ण करतात.
एका अभंगात नामदेव म्हणतात, की पांडुरंगच भक्तांना सांगत आहे, बाबारे आषाढी - कार्तिकीला मला विसरू नका.
आषाढी कार्तिकी विसरू नका मज । सांगतसे गूज पांडुरंग ।।

ही परंपरा भानुदास व एकनाथ या संतांनी चालविली. भानुदासांनी तर विजयनगरला नेलेली मूर्ती परत आणली व वारीची परंपरा खंडित होवू दिली नाही. एकनाथ महाराज ही पायी वारी करीत होते. त्यांनी अभंगात म्हटले आहे,

धन्य धन्य पंढरपूर। वाहे भीवरा समोर।
म्हणोनि नेमे वारकरी। करती वारी अहर्निशी।


त्यानंतर तुकारामांच्या काळातही पंढरीची वारी मोठ्या प्रमाणावर भरत होती. ते म्हणतात,

आषाढी निकट । आला कार्तिकीचा हाट ।
पुरे दोन्हीच बाजार। नलगे आणिक व्यापार।


असे म्हणतात की, तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका गळ्यात घालून पंढरीची वारी पायी करत होते. तुकाराम महाराजांची परंपरा बहिणाबाई, त्यांचे वंशज चौदा टाळकरी, रामेश्वर भट्ट अशा अनेक लोकांनी पुढे चालविली. पण, ती चालविणार्‍यांमध्ये साक्षात्कारी संत होते. नंतर संत तुकाराम महाराजांना विठोबारायांनी दृष्टांत दिला व उपदेश दिला. निळोवबारायानंतर शंकरस्वामी शिऊरकर यांना उपदेश प्राप्त झाला. त्यांच्यापासून मल्लाप्पा वासकर (शके 1631 ते 1721) यांना उपदेश प्राप्त झाला. त्यांनी फड काढला. नाथ, तुकोबा यांच्यानंतर लुप्त झालेल्या फडांना त्यांनी पुन्हा चालना दिली. त्यानंतर प्रमुख फड निर्माण झाले. त्यात वासकर फडाला अग्रस्थान प्राप्त झाले. तुकाराम महाराजांचे पणतू गोपाळ बुवा यांचाही फड महत्वाचा मानला जातो.
म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनंतर नामदेव, गोरा कुंभार, नरहरी सोनार, त्यानंतर भानुदास, एकनाथ, तुकाराम निळोबा, शंकरस्वामी, शिऊरकर मल्लाप्पा वासकर यांनी पंढरपूरच्या वारीचा क्रम वाढवीत नेला.

ज्ञानेश्वर महाराजांचा आजचा जो सोहळा आहे त्यांची सुरूवात मात्र दोनशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या हैवतबाबा आरफळकर यांनी केली. त्यांचा जन्म सरदार कुळात झाला होता. ते ग्वाल्हेरहून परत येत असताना चोरांनी गाठले व एका गुहेत कोंडले. तेथे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा धावा केला. त्याच राजाच्या नायकास मुलगा झाला व आनंदाप्रीत्यर्थ त्यांनी हैबतबाबांना सोडले. ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने आपण सुटलो. आता उर्वरित आयुष्य ज्ञानोबारायांच्या चरणी अर्पण करू, असा निर्धार करून ते आळंदीला आले व तेथेच राहिले. आळंदीला माउलीच्या समाधीपुढे रात्रीच्या शेजारतीपासून सकाळच्या आरतीपर्यंत ते भजन करीत. त्यांनी मनोभावे माउलींच्या सेवेत आपले आयुष्य घालविले. त्यांच्यापूर्वी माउलीच्या पादुका गळ्यात घालून पंढरपूरच्या वारीला येण्याची प्रथा होती. बाबांनी त्या पादुका पालखीत घालून दिंड्या काढून भजन करीत सोहळा नेण्याची परंपरा सुरू केली.

महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून या दिंड्या निघतात, दोनशेहून अधिक दिंड्यांची नोंद आहे. या सर्व दिंड्यामधल्या लोकांमध्ये उत्तम शिस्त पाहण्यास मिळते. दिंड्यांसह असंख्य लोक महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील कानाकोपर्‍यातुन पंढरीकडे श्री विठ्ठल दर्शनासाठी येतात. आषाढ शुद्ध दशमीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या या असंख्य पालख्या आणि दिंड्या एकमेकांना भेटतात. इथुन आषाढ शुद्ध दशमीला सकाळी सर्व पालख्या हळुहळु पंढरीकडे जायला निघतात. आषाढीला सारे वारकरी पवित्र चंद्रभागेत स्नान करुन संतांच्या पालख्यांसोबत पंढरी प्रदक्षिणा करतात. पंढरपूरच्या दिंडीमध्ये पडणारे प्रत्येक पाऊल हे तीर्थक्षेत्राला गेल्याचे पुण्य मिळवून देते.

हा अपूर्व सोहळा जगात एकमेवाद्वितीय आहे.

।। जय हरी विठ्ठल ।।
।। विठ्ठल ।। विठ्ठल ।। विठ्ठल ।।



https://www.polstech.com/pandurang-vitthala


We new friends!